26 July International Mangrove Day

२६ जुलै : आंतरराष्ट्रीय खारफुटी संवर्धन दिन

समुद्राच्या कुशीतले हिरवे रक्षक

प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर, जिथे खारट पाणी जमिनीला भेटतं, तिथे उभं असतं एक जिवंत संरक्षण — मॅन्ग्रोव्ह जंगलं. ही हिरवीगार वनश्री फक्त पर्यावरणाचं सौंदर्य वाढवत नाही, तर आपल्या किनाऱ्यांचं रक्षण करत असते. अशाच या अमूल्य वनसंपत्तीच्या संवर्धनासाठी दरवर्षी २६ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मॅन्ग्रोव्ह संवर्धन दिन साजरा केला जातो.

मॅन्ग्रोव्ह म्हणजे काय?

मॅन्ग्रोव्ह ही खारट पाण्यात वाढणारी विशेष झाडांची जाळी असते. भारतात, विशेषतः कोकण, सुंदरबन (पश्चिम बंगाल), महाराष्ट्र, गोवा, आणि आंध्रप्रदेश या भागांत ही झाडं आढळतात. त्यांच्या मुळांमुळे मातीला धरून ठेवण्याचं सामर्थ्य असतं आणि त्यामुळे किनाऱ्यांची धूप व पूरांपासून संरक्षण होतं.


कांदळ बिया – Rhizophora mucronata

विवीपेरस (viviparous plantation )बिया झाडावरच अंकुरतात आणि मग गळून खाली पडतात

तिवर फुले – Avicennia marina

लहान बिया – जमिनीत शोष मुळांमध्ये अडकून तिथे थेट उगम पावतात.

पांढरी चिप्पी फुले – Sonneratia alba

सुगंधी फुले मधमाश्यांना आकर्षित करतात , फळ(Star Apple) तयार आत झाल्यावर गोड सुगंधित द्रव मिळतो

का साजरा होतो २६ जुलै?

२६ जुलै १९९८ रोजी, हायहाओ डॅनियल नॅनोटो नावाचे एक ग्रीनपीसचे पर्यावरण कार्यकर्ते फिलिपाइन्समध्ये मॅन्ग्रोव्ह रक्षण मोहिमेदरम्यान मरण पावले. त्यांच्या कार्याला आणि बलिदानाला स्मरून UNESCO ने २०१५ मध्ये २६ जुलै हा आंतरराष्ट्रीय मॅन्ग्रोव्ह संवर्धन दिन म्हणून घोषित केला.

हा दिवस केवळ त्यांच्या स्मरणार्थ नसून, संपूर्ण जगाला मॅन्ग्रोव्ह संवर्धनाचे महत्त्व समजवणारा जागर आहे.


मॅन्ग्रोव्ह जंगलांचे फायदे

  1. चक्रीवादळ, समुद्रफाटा, आणि पूर यांपासून संरक्षण
  2. मासळी, कोळंबी यांसारख्या सागरी जीवांचे निवासस्थान
  3. हवामान बदल थांबवण्यासाठी कार्बन शोषण
  4. स्थानिक समाजासाठी उपजीविकेचा स्रोत – मच्छीमारी, औषधी, पर्यटन इ.

धोके आणि आवश्यकता

आज अनेक ठिकाणी शहरीकरण, औद्योगिक प्रकल्प, अनैसर्गिक-पर्यटन विकास, प्लास्टिक प्रदूषण यामुळे मॅन्ग्रोव्ह नष्ट होत आहेत. एकदा ही परिसंस्था नष्ट झाली, तर ती पुन्हा उभी करणं अत्यंत कठीण आहे.


आपण काय करू शकतो?

  • प्लास्टिकचा वापर कमी करा.
  • स्थानिक पातळीवर खारफुटी लागवडीसाठी मोहिमा राबवा.
  • पर्यटन करताना जंगल, नदी-नाले, समुद्र मध्ये प्लास्टिक कचरा टाकू नका.
  • पर्यावरणपूरक पर्यटन, शाळा, महाविद्यालये यामार्फत प्रबोधन व जनजागृती करा.

निष्कर्ष

मॅन्ग्रोव्ह ही निसर्गाची आपल्याला दिलेली एक कवचकुंडलेसारखी देणगी आहे. २६ जुलै हा दिवस त्या रक्षणाचा संकल्प पुन्हा एकदा जागवण्याचा आहे.
आपण जर आज सजग झालो, तर उद्या आपली किनारे आणि पर्यावरण सुरक्षित राहतील.

“मॅन्ग्रोव्ह वाचवा – किनाऱ्याचं जीवन वाचवा!”

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *